
श्री शिंगणापूर ऑफिकल वेबसाइटवर आपले स्वागत आहे
श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा या देवस्थानची ख्याती दूरदूर वर घरांना दरवाजे नसलेल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानच्या रुपात जगात प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्याला श्री संतांची भूमी मानतात. उगीच काही लोक श्री शनिदेवाचे नाव काढताच घाबरतात. वास्तविक ही सर्व भीती खोटी आहे. श्री शनी देव आपला शत्रू नसून तो मित्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात तेजपुंज व शक्तीशाली शनीचे आगळे-वेगळे महत्व आहे.
आपले शरीर पंच तत्वांनी पंच महाभूतांनी बनलेले आहे. अन यांचा (पंच महाभूत) परिणाम आपल्या शरीरावर होत आसतो, हेच ग्रह आपल्यावर नियंत्रण करीत असतात. शनी सौर जगातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे, शनीची गुरुवाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या मनात जो काही विचार येतो, ज्याला कल्पना, योजना आखतो त्याची चांगली आथवा वाईट योजना चुंबकीय शक्तीने शानिपर्यंतपोहचते. फलस्वरूप चागल्यांचा परिणाम चांगला वाईटचा परिणाम वाईट तत्काळ दिसून येतो.
महाराष्ट्रात, भारतात तर सर्वच शनी शिंगणापूरच्या महिमेशी परिचित आहेत, परंतु श्री शानिदेवांची कीर्ती साता समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचली आहे. अशा या जागतिक ख्याती पावलेल्या देवस्थानाकडे श्री शनी देवाच्या दर्शनानंतर ह्याच श्री शनी देवावर सामाजिक धार्मिक शास्त्रीयसांस्कृतिक भोगोलिक कौटुंबिक अनुभवाच्या ज्ञानावर आधारलेली माहिती सर्व भक्तांसाठी उपलब्ध करीत आहोत.
Read more →श्री शनिदेव
आपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. पृथ्वी….
Read more →पूर्ण झालेले प्रकल्प
विद्यमान प्रकल्प
बातम्या आणि इव्हेंट
उपलब्ध नाही
प्रसाद स्थान
प्रसादडली बिल्डिंगमधील भक्तगणांसाठी श्रीदेवीचा प्रसाद रोज उपलब्ध आहे.
सकाळी १० ते ०३
सायंकाळी शनिदेवांच्या आरती नंतर ते ०९
प्रत्येक व्यक्तिसाठी नाममात्र रक्कम मध्ये कुपन ची व्यवस्था आहे
आरती बेल
5:30A.M. 1st
9:30A.M. 2nd
12:30P.M. 3rd
8:30P.M. 5th
उत्सव
Read more →श्री शनि शंकर जयंती, श्री शनिदेवाचा जन्मदिवस विशेष दिवस, मोठ्या उत्साह आणि भक्ती सह साजरा केला जातो.
दरवर्षी ‘चैत्र शुध्द दशामी’ पासून ‘चैत्र वाद्या प्रतिपदा’ पर्यंत, सतत देवाचे नाव आणि ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण’ जप करत आहे.
शनिदेवाची आरती
|| श्री ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||
नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||
प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||
ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||
दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||