अलौकिक देवस्थान

सर्वसाधारणत: मनुष्य कुणासमोर ही सहसा झुकत नाही. चमत्काराशिवाय, अनुभवा विना दोन हात तिसरे मस्तक तो कुणासमोर ही शरण जात नाही. एकविसाव्या शतकात विज्ञानाची घोडदौड चालू आहे. परंतु शिंगणापूरला आल्यानंतर श्री शनिदेवाचे चमत्कार पाहिल्यानंतर विज्ञानयुग व इंटरनेट सुध्दा इकडे चमत्कारिक दृष्टीने पाहते. मला नक्की खात्री आहे कि एखादा कितीही नास्तिक जरी असला तरी हे चमत्कार पाहिल्यानंतर त्यांचे मत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती शनैश्वराच्या समोर नतमस्तक होते.

श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर ता.नेवासा हे अन्य देवालयापेक्षा आगळ वेगळ आहे. ह्या तीर्थक्षेत्राचा परिसर मनाला भक्तीच्या मार्गाला लावणारा असा नयनमनोहर आहे. श्री शनैश्वराच्या देवालयाजवळील वातावरण आगदीच आगळेवेगळे आहे. देवाच्या भेटीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी जे बडवे, पुजारी, पंडे असतात तसे तुम्हाला शनी शिंगणापुरात सापडणार नाहीत. अभिषेक पूजा वा इतर धार्मिक विधी आपली इच्छा असेल तरच करतात. म्हणून ह्या शतकातील पहिल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वारासाठी आलेले सर्व उत्तर भारतीय भक्त श्री शनी शनी शिंगणापूरला येऊन दर्शन घेऊन व येथील कारभार पाहून कृतकृत झालेत.

इथे अनिच्छेने धार्मिक विधी करावयास लावत नाहीत पैसे हि कुणी मागत नाही भाविकास लुबाडले जात नाही. मनाकर्षण अशी भव्य दिव्य मंदिरे नाहीत, परंतु प्रसन्नतेचे वातावरण आहे. पूजेचे साहित्य घेतल्यावर ” पैसे पूजा आटोपल्यावर आणून द्या ” असे सांगणारे दुकानदार फक्त इथेच आहेत. आर्थात पैसे न बुडवणारे भाविक सुध्दा तुम्हाला इथे पहावयास मिळतील. देवदर्शनाला गेल्यावर जास्तीत जास्त दक्षिणा मागणारे पुजारी दिसणार नाही. देव दर्शन आटोपल्यावर ढकलून मंदिराच्या बाहेर काढून देणारे आडदांड पुजारी दिसत नाही. त्यामुळे मनसोक्त दर्शन घेता येते. दर्शन घेऊन आल्यानंतर वेडीवाकडी तोंडे करून भिक्षेसाठी आग्रहाने आडवे येणारे भिकारी तुम्हाला दिसणार नाहीत. नवस पूर्तीसाठी भंडारा घेऊन येणारे भाविक इथे दिसतात. त्यांना मदत करणारे ग्रामस्त व विश्वस्त दिसतील. केलेल्या मदतीबद्दल त्यांच्या कडून मोबदल्याची अपेक्षा करणार नाहीत. अस इतर देवस्थानात पहावयास मिळत नाही म्हणून हे अलौकिक देवेथान होय.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा