न्यायाधीश

माझ्या मते श्री शनिदेव हे व्यक्तीच्या चांगल्या – वाईट कर्माच्या फळांचा न्यायनिवाडा करीत असतो. म्हणून श्री श्री शनिदेव हे न्यायमूर्ती होय. संसारात मनुष्य जेव्हा जेव्हा राग, लोभ , मोह, मत्सर ने प्रभावित होवून आपले नियत्रंण सोडतो आणि जाणते पणाने चारी बाजूला असलेल्या अन्याय , अत्याचार , पापाचार , भ्रष्टाचार , व्यभिचाराला साथ देतो, अंधारात गुपचूप कुणाला न कळत वाईट कर्म करतो त्याला क्षणभर असे वाटत असते की, मी हे जे कृत्य करतो याला कुणीही पाहत नाही, म्हणून तो आजून त्या कुकृत्यात सामील होत असतो. आपल्या अंहकारात तो स्वःताला सर्वश्रेष्ठ समजतो . प्रत्यक्ष परमेश्वराला तो हया नशेत विसरतो. म्हणून अशा माणसांना आपल्या मर्यादा समजाव्या , त्याला जागृत करावे , त्याच्या आत्मपरीक्षण व आत्मचिंतनासाठी श्री शनिदेव त्याला शिक्षा वा दंड देत असतो , त्याला साडेसाती लागते. अशा काळात श्री  शनिदेव न्यायकर्ता बनून त्याला साजेशी शिक्षा ठोठावत असतो. लक्षात असू द्या शनीला सूक्ष्म-दिव्य अशी दृष्टी आहे. तसेच तो योग्य त्या कर्माचे फळ देत असतो. ज्याचे जसे कृत्य असेल त्याला तसे तो फळ देत असतो. म्हणून श्री शनिदेवाला न्यायाधीश संबोधन सुयोग्य वाटते.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा